२९ जूनच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत वेतन आयोगावर अंतिम निर्णय

pay-commission
नवी दिल्ली : २९ जून रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यावर गांभिर्याने विचार करत आहे.

कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू झाल्यास १५ ते २० टक्के वाढ होईल. सातव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १.०२ लाख कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. जानेवारी महिन्यातच केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रक्रियेबाबत अभ्यासासाठी मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. सातवा वेतन आयोग लागू झाल्यास याचा लाभ जवळपास ९८.४ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होईल. यामध्ये ५२ लाख निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

Leave a Comment