शाही थाटात पार पडला म्हैसूरच्या युवराजाचा विवाह सोहळा

yaduveer
म्हैसूर – सोमवारी सकाळी राजघराण्याचे युवराज यदुवीर क्रिष्णदत्ता चामराजा वडीयार यांचे शाही लग्न पार पडले. राजस्थानच्या त्रिशीका कुमारी सिंग या राजकुमारीसोबत ऐतिहासिक अम्बा विलास पॅलेस येथे हा विवाह सोहळा पार पडला.

राजस्थानमधील डुंगरपूर राजघराण्यातील हर्षवर्धन सिंग याच्या त्रिशीका कुमारी या राजकुमारीसोबत ऐतिहासिक म्हैसूर राजघराण्याचे युवराज यदुवीर यांचा विवाह करण्याचे मागील वर्षीच्या मे महिण्यात निश्चीत झाले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी हा शाही विवाह सोहळा पार पडला. शनिवारीपासून या युवराज आणि राजकुमारीला खास स्नान घालण्यात आले होते.

त्यानंतर त्यांची राजघराण्यातील राजगुरुंच्या हस्ते पूजा करुन विधी पार पाडण्यात आले. तर सोमवारी सकाळच्या शुभ मुर्हतावर त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला. दरम्यान या शाही विवाह सोहळ्याला राजघराण्यातील नामांकीत व्यक्तींसह राजघराण्यातील व्यक्ती उपस्थित होत्या.

Leave a Comment