अमेरिकेच्या बोस्टन डायनामिक्स कंपनीने घरगुती कामे करण्यासाठी चार पायांचा व डोळे असलेला, कुत्रा व जिराफाशी साध्यर्म दाखविणारा रोबो सादर केला असून या क्यूट रोबोला स्पॉटमिनी असे नाव दिले गेले आहे.
घरगुती कामे करणारा क्यूट मिनिस्पॉट रोबो
हा रोबो जिने चढू शकतो, टेबलाखालून जाऊ शकतो, उंच मानेचा उपयोग करून रिकामे कॅन डस्टबिन मध्ये टाकणे, साफसफाई, वस्तू इकडच्या तिकडे नेऊन ठेवणे अशी कामे सहज करू शकतो. केळीच्या सालावरून घसरून पडला तरी तो आपलाआपणच उठतो व परत कामाला लागतो. त्याची इंटरनल बॅटरी ९० मिनिटे चार्ज राहते. अर्थात सगळीच कामे हा रोबो करत नाही. कांही कामे तो स्वतः करू शकतो तर कांही कामांसाठी त्याला माणसाची मदत लागते.