पाण्याने हिरावले महिलांचे सौभाग्य लेणे!

widow
कटोआ – पश्चिम बंगालमधील एका गावाला ‘विधवांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. विधवा महिलांची संख्या या गावात इतकी आहे, की या गावाचे नावच विधवांचे गाव पडले आहे. पण या गावाला विधवांचे गाव का म्हणतात त्यामागे असणारे कारण समजल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या गावातील पाण्यात आर्सेनिक या विषारी घटकाचे प्रमाण अधिक असल्यामुळे गावातील २२ लोकांची बळी गेला आहे.

तर दुसरीकडे बर्दवान जिल्ह्यातील कल्‍याणपूर गावातील लोकांनी सांगितले की, आर्सेनिक या विषारी घटक मिश्रित पाणी पिल्यामुळे मरणाऱ्यांची संख्या ५० हून अधिक आहे. गावातील अनेक महिलांनी त्यांचे सौभाग्य लेणे गमावले आहे. या महिला पांढरी वस्त्रे परिधान करून गावातील अन्य महिलांच्या पतींचे सक्षण करण्याची मागणी प्रशासनाकडे करत आहेत. सन २००५ पासून गावातील पाण्यात आर्सेनिकचे प्रमाण वाढत चालले आहे. परंतु याकडे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गावातील अनेकांचे प्राण गेले आहेत तर अनेक जीवघेण्या आजारांचे शिकार ठरले आहेत. गावातील लोकांनी सांगितले की, त्यांनी याविषयी प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार केली परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. सरकारने स्‍वच्‍छ पाणीपुरवठा करण्याच्या नावावर केवळ एक तलाव तयार करून दिला आहे.

Leave a Comment