नासाच्या स्पर्धेत १३ भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश

nasa
ह्युस्टन : टाकाऊ वस्तूंपासून रिमोटने संचालित केली जाणारी वाहने तयार करण्याच्या नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेतर्फे अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत अभियांत्रिकीच्या १३ विद्यार्थ्यांचा समावेश असलेले भारतीय पथक सहभागी झाले आहे. ‘स्क्रू ड्रायव्हर्स’ असे स्पर्धेत सहभागी होणा-या भारतीय चमूचे नाव असून त्यामध्ये मुंबईस्थित मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

चीन, स्कॉटलंड, रशिया, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड, मेक्सिको, नॉर्वे, डेन्मार्क, ईजिप्त, तुर्की आणि पोलंड यासह एकूण ४० देशांचे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ह्युस्टन येथे नासाची ही १५ वी वार्षिक इंटरनॅशनल रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल (आरओव्ही) स्पर्धा सुरू झाली. मरीन अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी एज्युकेशन अर्थात मेट या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली असून स्कू ड्रायव्हर्स ही एकच भारतीय चमू यात सहभागी झाली आहे. नासाच्या जॉन्सन स्पेस कॅण्टरच्या न्युट्रल बुयोयन्सी लॅबमध्ये २३ ते २५ जून या कालावधीत होणा-या या स्पर्धेत प्रा. सावनकुमार नाईक यांच्या नेतृत्वात हे पथक भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणा-या विद्याथ्र्यांकडून टाकाऊ वस्तूंपासून रिमोटने संचालित केली जाणारी वाहने तयार करणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे लक्ष्य दरवर्षी बदलत असते. मात्र त्याचा आधार हा नेहमी ओशियन इंजिनीअरिंग हाच असतो, असे मुख्य तांत्रिक अधिकारी विजेंदर जोशी यांनी सांगितले.

Leave a Comment