दूधसागर स्थानकावर थांबणार नाही रेल्वे

dudhsagar
कारवार : पर्यटकांना पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पिकनिकचे. पर्यटक जगभरात प्रसिद्ध असलेला आणि चेन्नई एक्सप्रेसमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेल्या दूधसागर डॅमकडे आकर्षिले जातात. हजारो पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी लांबून येतात.विशेष म्‍हणजे कोकण रेल्‍वे या धबधब्‍याच्‍या खालून जाते. त्‍यामुळे येथे रेल्‍वे मोठ्या संख्‍येने पर्यटक येतात. मात्र, या पुढे दूधसागर स्थानकावर रेल्वे न थांबविण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.

हा धबधबा कर्नाटकापासून १.५ किमी अंतरावर असलेल्या या दगडांजवळ आहे. दूधसागर या धबधबा १०१७ फूट लांब आहे. जगातील सर्वात लांब वॉटरफॉल म्हणून दूधसागर ओळखला जातो. कर्नाटक-गोवा सीमेवरवर हा दुधसागर धबधबा आहे. कर्नाटकमधील कॅसलरॉक आणि लोंढासह बेळगाव रेल्वे स्थानकावरून दूधसागरकडे ट्रेन येतात. शनिवार, रविवार या सुट्यांच्‍या दिवशात येथे प्रचंड गर्दी असते. रविवारच्या दिवशी एर्नाकुलमसह अन्य दोन गाड्या आणि मालगाड्यांतूनही पर्यटक दुधसागरला जातात. मात्र येताना गोवा एक्सप्रेस ही एकमेव गाडी आहे. परिणामी या गाडीवर ताण पडतो. बर्‍याचवेळा पर्यटकांना या गाडीतून येणेही जमत नाही. त्यामुळे रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. त्याचाच विचार करून गतवर्षीदेखील रेल्वेमधून दूधसागरला जाण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. दूधसागर रेल्वे थांब्याला फलाट नाही. शिवाय येथे अनेक वेळा अपघातही झाला आहे.

Leave a Comment