आरबीआय घालणार एटीएममधील फसवणूकीला आळा

rbi
नवी दिल्ली – सामान्य जनतेची एटीएम कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतल्यामुळे एटीएम आणि डेबिट कार्ड पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित राहतील. आरबीआयचा एटीएम आणि डेबिट कार्डमधील सुरक्षा प्रणालीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न असल्यामुळे ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसुद्धा सुरक्षित होईल. कार्डच्या सुरक्षिततेबरोबरच एटीएमच्या माध्यमातून मिळणा-या सेवांच्याही संख्येमध्ये वाढ करण्याचा आरबीआयचा प्रयत्न असल्याने वापरकर्त्यांना अनेक सुविधांचा लाभ घेणे सोपे जाईल.

पेमेन्ट आणि सेटलमेन्ट प्रणाल व्हिजन २०१८मध्ये प्रमुख तीन रुपांनी सुरक्षा वाढविण्यावर आरबीआयने लक्ष केंद्रीत केला आहे. यानुसार डेबिट कार्डमध्ये वापरण्यात येणा-या चिपमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात येतील. याचबरोबर कार्ड रिडिंग प्रणालीमध्ये बदल करण्यात येतील. तिसरी सुरक्षा म्हणजे एटीएमवर डिजिटलबरोबरच फिजिकल सुरक्षा वाढविण्यात येईल.

आता बँकांकडून देण्यात येणा-या कार्डमध्ये ईएमव्ही चिप असणे अनिवार्य असेल. याव्यतिरिक्त मॅग्नेटिक चिपचा वापर बंद करण्यात येईल. यामुळे कार्ड हॅकिंग होण्याच्या प्रमाणामध्ये घट होईल. एटीएममध्ये तोड-फोड, लुटमार होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासाठी आरबीआय डिजिटल सुरक्षेबरोबरच फिजिकल सुरक्षा वाढविण्यावर भर देणार. यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आरबीआयकडून जारी करण्यात आली. या तीन सेवांव्यतिरिक्त कोणतेही पेमेन्ट करताना आधार कार्डची पडताळणी करणे गरजेचे भासणार आहे.

Leave a Comment