वयाच्या १३ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट करुन रचला इतिहास

everest
हैदराबादः वयाच्या १३ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करुन तेलंगना राज्याच्या दलित भागात राहणाऱ्या मुलीने इतिहास रचला आहे. एवढ्या कमी वयात ही मुलगी हिमशिखर सर करणारी जगातील पहिलीच व्यक्ति ठरली आहे.

या हिमकन्येचे नाव मालवथ पूर्णा असे असून ती तेलंगनामधील निझामाबाद जिल्ह्यातील आहे. जन्म १० जून २००० साली पूर्णाचा झाला आहे. ती सध्या ९ वीच्या वर्गात शिकते. पूर्णाच्या बाबतीत सर्वात विशेष गोष्ट म्हणजे यापूर्वी तिने कसलेही शिखर चढलेले नाही. पूर्णाने १० नेपाळच्या गाईडसोबत चढाईला सुरुवात केली. चढाई करण्यासाठी सप्टेंबर २०१५ मध्ये प्रशिक्षण घेतल्याचे पूर्णाने सांगितले.

या चढाईमध्ये पूर्णाला शासनाची मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. जवळपास ७ महिने पूर्णाने चढाई करण्याचे प्रशिक्षण घेतले. ही पूर्ण चढाई करण्यासाठी पूर्णाला ५२ दिवस लागले. या काळात रस्त्यात ६ गिर्यारोहकांचे मृतदेह भेटल्याचे पूर्णाने सांगितले.

२०१० साली पूर्णाच्या अगोदर अमेरिकेच्या जॉर्डन रोमेरो या सर्वात कमी वयाच्या मुलाने एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला होता. मात्र त्याच्या वयावरुन अनेक तर्क वितर्क लावण्यात आले होते. पूर्णाला ही चढाई करण्याची संधी मिळाल्याबद्दल ती खूष आहे. आदीवासी समाजातील लोक सुद्धा काहीही करु शकतात, हे सिद्ध करायचे आहे. तसेच अजून अनेक शिखर पार करायचे आहेत. शिवाय पोलिस अधिकारी बनायचे असल्याचे पूर्णा सांगते.