वडा पावचा जागतिक पातळीवर वाजणार डंका

vada-pav
पुणे – इंडियन वडापाव गव्हर्नन्स कौन्सिल व मिशन सेफ फूड इंडिया यांनी वडापाव जागतिक पातळीवर भारतीय स्ट्रीट फूड म्हणून नेण्यासाठी सुरू केलेल्या मिशनमध्ये गुरूवारी भारताच्या भेटीवर असलेले प्रसिद्ध ख्रिस्ती गुरू डॉ.जेफ्री महाबना व त्यांच्या टीमला वडापावची चव चाखवली. विशेष म्हणजे डॉ.जेफ्री व त्यांची टीम वडापावच्या चवीने भारून गेल्याचे समजते.

या संस्थांनी फूट टेस्टींग सेशनमध्ये डॉ.जेफ्री व त्यांच्या टीमला आंमत्रित केले होते. अर्थात त्यांना खिलवण्यात आलेला वडापाव थोड्या वेगळ्या पद्धतीने बनविला गेला होता. त्यासाठी पाच वेगवेगळे ब्रेड वापरले गेले होते व वडा शद्ध तेलात तळला गेला होता. वडापावला जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाही आंतरराष्ट्रीय किर्तीच्या व्यक्तीना ही संस्था आमंत्रित करून त्यांना वडापाव खिलविणार आहे असे मिशन सेफ फूडचे प्रमुख सल्लागार सानी अवसरमल यांनी सांगितले.

Leave a Comment