रोल्स रॉयसची आलिशान ‘डॉन’ लॉन्च

rolls-royce
नवी दिल्ली – आलिशान कारचे उत्पादन करणाऱ्या रोल्स रॉयसने आपली सुपर लक्झरी कन्व्हर्टिबल कार डॉन लॉन्च केली आहे. या कारची किंमत ६.२५ करोड रुपये आहे. डॉन लक्झरी कूपे रॅथ बेस्ड मॉडेल असून ज्याची विक्री भारतात पहिल्यापासून होत आहे.

डॉन आणि रॅथमध्ये बरेच काही साम्य असून डॉनच्या बॉडीमध्ये ८० टक्के नाविन्यपूर्ण करण्यात आले असून डॉनमध्ये त्या विविध सुविधा आहेत. ज्यासाठी रोल्स रॉयस जगभरात प्रसिद्ध आहे. डॉनला जगातील सर्वात जलद कन्व्हर्ट होणारी कर म्हटले गेले आहे. याचे ६-लेअर सॉफ्ट ड्रॉप टॉप केवळ २२ सेकंदात विना आवाज फोल्ड होते. डॉनमध्ये सिग्नेचर रोल्स-रॉयस व्हि १२ इंजिन लावण्यात आले असून ज्यात ५७१ पीएस पावर आणि ७८० एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. यात ८-स्पीड जेएफ ट्रांसमिशन सिस्टम देण्यात आले आहे.

Leave a Comment