रात्रीच्या अंधारात स्मार्टफोन वापरणे पडू शकते महागात

smartphone
मुंबई – सध्याच्या काळात प्रत्येकजणाच्या हातामध्ये स्मार्टफोन आले आहेत. त्यातल्या जवळपास सर्वांनाच रात्री स्मार्टफोन वापरण्याची सवय लागलेली आहे. मात्र, रात्रीच्या अंधारात स्मार्टफोन वापरणे आता तुम्हालाला महागात पडू शकते. अंधारामध्ये वारंवार स्मार्टफोनची स्क्रिन पाहणे यूजर्सच्या डोळ्यांसाठी अपायकारक असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

अंधारामध्ये स्मार्टफोन वापरणा-या युजर्सपैकी अनेक लोकांची दृष्टी कमकुवत झाल्याचे निदर्शनात आले आहे तर दोन महिलांनी दृष्टी गमावली आहे. या महिलांनी अंधाऱ्या खोलीमध्ये अधिक काळ स्मार्टफोनचा वापर केल्याने हे घडले असल्याचे म्हटले जात आहे.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार, एका महिलेचे वय २२ वर्ष आहे तर दुस-या महिलेचे वय ४० वर्ष आहे. या महिला अंधारात स्मार्टफोनचा वापर करत होत्या असे समोर आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या महिलांना सांगितल्यानंतरही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी आपली दृष्टी गमावली आहे.

रिपोर्टनुसार, काही काळासाठी या महिलांना दिसत नाही. या महिलांच्या अनेक टेस्ट करण्यात आल्या मात्र, असे का होते हे कळू शकले नाही. यानंतर महिलांना विचारण्यात आले की दिसत नसल्याचा त्रास तुम्हाला कधी जाणवतो त्यावेळी त्यांनी सांगितले की रात्री स्मार्टफोनचा वापर करत असताना नेहमी हा त्रास जाणवतो. अंधारात स्मार्टफोनचा वापर करून तो बंद केल्यानंतर काही मिनिटे यूजर्सना काहीच स्पष्टपणे दिसत नाही. म्हणजेच तुम्हालाही टेम्पररी ब्लाइंडनेसचा अनुभव येत असेल तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. रिपोर्टनुसार, अंधारात स्मार्टफोन वापरताना आपले डोळे फोनच्या स्क्रीनची लाईटनुसार काम करतात. मात्र, ज्यावेळी तुम्ही दुस-या डोळ्याचा वापर करता तेव्हा दोन्ही डोळ्यांच्या दृष्टीमध्ये फरक पडतो. त्यामुळे असे करु नये.

Leave a Comment