नवी दिल्ली : आपल्या QuientComfort या सिरीजचा QuientControl 35 आणि QuientControl ३० हे दोन नवे हेडफोन्स नुकतेच अमेरिकेतील प्रसिद्ध ऑडियो इक्विपमेंट बनवणारी बोस या कंपनीने लाँच केले असून या हेडफोन्सची किंमत अनुक्रमे २९,३६३ रुपये आणि २६,४३८ रुपये असणार आहे.
बोसचे दोन वायरलेस हेडफोन लाँच
नव्या तंत्रज्ञानाचे फिचर्स या हेडफोन्समध्ये देण्यात आले असून कोणत्याही अडचणीविना चांगल्या म्युझिकचा अनुभव देण्यासाठी डिजिटल नॉइस कँसिलेशनचे तंत्रज्ञान यामध्ये देण्यात आले असून हे हेडफोन्स ब्लॅक आणि सिल्व्हर या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. आवाजाची क्षमता त्याच्या लेवलमध्ये बॅलेन्स व्हावा यासाठी नव्या म्युझिक इक्विलायझरची सुविधा देण्यात आली आहे. या हेडफोनमधून २० तासांपर्यंत गाणी ऐकण्याचा अनुभव घेता येणार आहे.