फॉक्सवॅगनने लाँच केली अमेओ

ameo
नवी दिल्ली : जर्मनची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या फॉक्सवॅगनने आपली सब कॉम्पॅक्ट सेडान कार अमेओ ही कार नुकतीच लाँच केली असून पेट्रोल वेरियंटमध्ये ही सेडान कार उपलब्ध होणार असून या पेट्रोल वेरियंट कारची किंमत एक्स शोरुममध्ये ५ लाख ३३ हजार ६२० रुपये ऐवढी असणार आहे.

१.२ लिटरचे पेट्रोल इंजिन या कारमध्ये असून ७३ बीएचपीचे पॉवर आणि ११० एनएमचा टार्क निर्माण करु शकणार आहे. याबरोबरच ५ स्पीड गिअरबॉक्स लेस करण्यात आले आहेत. याबरोबरच या सेडान कारमध्ये डय़ुअल फ्रंट एअरबॅग आणि एबीएस सिस्टिमसह अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. यामध्ये मिर्रोर्लिंक इंफोटेनमेंट सिस्टिम, क्रूज कंट्रोल, रेन सेसिंग वायपर्स आणि बूट एलइडची सुविधा देण्यात आली आहे. ही कार डिझेल लवकरच इंजिनच्या पर्यायामध्ये देखील उपलब्ध होणार असून यामध्ये १.५ लिटरचे डिझेल इंजिन देण्यात येणार आहे. तसेच ही कार ११० बीएचपीचे पॉवर जनरेट करु शकणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Comment