आता सर्वात स्वस्त एलईडी टिव्ही देणार फ्रीडम

freedom1
नवी दिल्ली – २५१ रुपयांमध्ये स्मार्टफोन देण्याचा दावा रिंगिंग बेल्स कंपनीने केला असून आता १० हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत रिंगिंग बेल्स कंपनी ३२ इंच एचडी एलईडी टीव्ही विकण्यास सज्ज झाली आहे. हा टिव्ही कंपनी १ जुलैपासून लॉन्च करणार आहे.

सध्या रिंगिंग बेल्स या ३२ इंच हाय-डेफिनेशन एलईडी टिव्हीला लॉन्च करण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे या टिव्हीचे नाव ही ‘फ्रिडम’च ठेवण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा टिव्ही लॉन्च करण्यात येणार आहे. यावर माहिती देताना कंपनीचे सर्वेसर्वा मोहितकुमार गोयल यांनी सांगितले, भारतात १० हजार रूपयांहून कमी किंमतीचा एलईडी टिव्ही उपलब्ध नसल्यामुळे ‘फ्रिडम’ भारतातील सर्वात स्वस्त टिव्ही असणार आहे. हा टिव्ही ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांना खरेदी करता येईल, अशी माहिती ही त्यांनी दिली. मुख्य म्हणजे ग्राहकांना फार काळ ताटकळत रहावे लागणार नाही. ऑनलाईन बुकींग केल्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरीवर ग्राहकांना टिव्ही उपलब्ध होईल.

Leave a Comment