लवकरच बाजारपेठेत दाखल होणार मारुतीची मिनी क्रॉसओव्हर इग्निस

maruti
नवी दिल्ली : लवकरच मारुती या वाहन निर्माण कंपनीने मिनी क्रॉसओव्हर इग्निस ही कार लाँच होणार असल्याची घोषणा केली असून या कारमध्ये १.२ लिटर K – सिरीज पेट्रोल आणि १.३ लिटर DDiS डिझेल इंजिन देण्यात आले आहे.

ऑटोकार इंडियाच्या वृत्तानुसार, या कारमध्ये पेट्रोल वेरियंटमध्ये ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या ऐवजी कंटिन्युअस्ली वेरिंग ट्रान्समिशन देण्यात येणार आहे. तसेच या मॅन्युअल युनिटमुळे ही कार बरेच इंधन बचत करणार आहे. यासोबतच या कारमध्ये प्रेश डिझायन, प्रोमिनंट हेड लँप्स, डय़ुअल टोन डॅश बोर्ड, टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम आणि नवे स्टिअरिंग व्हिल देण्यात येणार आहे. ही कार महिंद्राच्या केयुव्ही१०० ला टक्कर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment