ब्रेकिझटचा कांहीही लागो निकाल- सट्टेबाज झाले मालामाल

brexit
ब्रिटनने युरोपिय संघात राहावे की बाहेर पडावे यासाठी घेतल्या गेलेल्या जनमताची मोजणी सुरू असून त्याचा निकाल लवकरच हाती येणार आहे. मात्र ब्रिटनने युरोपिय संघात राहण्याचा वा बाहेर पडण्याचा कोणताही निर्णय दिला तरी यावर लावल्या गेलेल्या सट्टामुळे सट्टेबाज अगोदरच मालामाल झाले असल्याचे समजते. इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या विषयावर सट्टा लागण्याचा हा ब्रिटनमधील बहुतेक पहिलाच प्रसंग असावा असेही सांगितले जात असून यावर तब्बल १००० कोटींचा सट्टा लागला असल्याचे समजते.

याअगोदर चार वर्षापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकांत असाच मोठा सटटा लावला गेला होता. ब्रेक्झिट पोल मध्ये आठवड्याभरापूर्वी जी स्थिती होती त्याच्या बरोबर उलट स्थिती आता दिसते आहे. पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी ब्रिटनने युरोपियन संघात रहावे या बाजूने मते देण्याचे आवाहन जनतेला केले होते. युनियनमध्ये राहिले तर मजबूत राहू, बाहेर पडलो तर कमजोर होऊ असे कॅमेरून यांनी सांगितले होते. अंदाजानुसार युनियनमध्ये राहण्याच्या बाजूने मतदान होण्याची शक्यता ७३ ट्के इतकी आहे व त्यासाठी तीनास दहा पौंड असा सट्टा दर आहे. बाहेर पडण्याच्या शक्यतेचा दर पाचास दोन पौंड असा आहे. या जनमतात ४.६ कोटी लोकांनी मत नोंदविले आहे.

Leave a Comment