जगातले एकमेव नरक मंदिर

hell
दक्षिण पूर्व आशियातील थायलंड देशात एक अनोखे मंदिर आहे. देवदेवतांची मंदिरे आपण नेहमीच पाहतो पण येथे चक्क नरकाचे दर्शन घडविणारे मंदिर आहे. थायलंडच्या चिथांग मई गावातील या मंदिरात नरकाचे दर्शन घेण्यासाठी हजारेा भाविक येतात. त्यामागे पापांचे प्रायश्चित्त घ्यावे तसेच पश्चाताप व्यक्त करावा ही भावना असते.

थायलंडचे पूर्वीचे नांव सयाम. या देशात ऐतिहासिक महत्त्वाची तसेच सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची अशी अनेक हिंदू व बौद्ध प्राचीन मंदिरे आहेत. चियांग मई बँकाकपासून ७०० किमी अंतरावर आहे व हे थायलंडमधील दोन क्रमांकाचे मोठे शहर आहे. या शहरातही ३०० हून अधिक मंदिरे आहेत. त्यातील नरक मंदिर हे एकमेव आहे. या मंदिराची रचना नरकाप्रमाणेच केली गेली आहे. वट रट नोई असेही या मंदिराला म्हटले जाते. नरकात कशा प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात याचे दर्शन घडविणार्‍या अनेक भयानक मूर्ती येथे आहेत.

narak
मंदिराची रचना व स्थापत्यही अत्याचार व वेदना दर्शविणारे आहे. भिक्षू प्रा क्रू विशनजालिकॉन याने या मंदिराची रचना केल्याचे सांगितले जाते. त्यामागे तुम्ही पापाचरण केले तर तुमची कशी अवस्था होईल याची जाणीव लोकांना व्हावी व त्यांनी पापकर्म करू नयेत असा उद्देश होता.

Leave a Comment