मुंबई : आपला नवा कॅन्व्हास फायर ५ नुकताच देशातील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने लाँच केला असून फ्रंट फायरिंग ३D साऊंड इनव्हेसमेंट स्पीकर या फोनमध्ये देण्यात आल्याने हा फोन संगीतप्रेमींसाठी विशेष आर्कषण ठरणार आहे. हा स्मार्टफोन मेटल फ्रेमसह सिल्व्हर, ग्रे, शँपेन गोल्ड या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. कॅन्व्हास फायर ५ या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांसाठी कोणत्याही बाजूने कॉल करता यावा यासाठी ग्रॅव्हिटी कॉलिंग फीचर्स देण्यात आले आहे.
मायक्रोमॅक्सचा ३D साऊंडवाला कॅन्व्हास फायर ५ लाँच
कॅन्व्हास फायर ५ मध्ये ५ इंचाचा डिस्प्ले असून ३ GHz क्वॉडकोर मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १ जीबी रॅम आणि १६ जीबीची इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आले आहे. याचा रिअर कॅमेरा ८ मेगा पिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगा पिक्सलचा देण्यात आला आहे. यात वाय-फाय, ब्लूटूथ, ३ जी अशा कनेक्टिव्हिटी देण्यात आल्या आहेत. याचे ऑपरेटिंग सिस्टम मार्शमॅलो बेस असून याची किंमत ६१९९ रुपये एवढी आहे.
Every person who are looking Micromax any
Mobile or smart phone I suggest them very dam products so keep alert