ब्रेबसची अतिवेगवान कव्हर्टीबल कार कॅब्रियो

brabus
जर्मन ऑटो कंपनी ब्रेबसने जगातील पहिली अतिवेगवान फोर सीटर कन्वर्टीबल कार प्रदर्शित केली आहे. ब्रेबस ८५० ६.० बायटर्बो कॅब्रियो या नावाने ती बाजरात दाखल झाली आहे. ब्रेबस ही कंपनी लग्झरी कार्स ट्युनिंगग करून त्या दमदार कार मध्ये रूपांतरीत करण्याचे काम करते. त्यामुळे ब्रेबस ८५० ६.० ही प्रत्यक्षात मर्सिडीजच्या एएमजी एस ६३ वर आधारित आहे. याचाच सरळ अर्थ असा की तुम्हाला ब्रेबसची ही वेगवान कार हवी असेल तर प्रथम मर्सिडीज खरेदी करावी लागणार आहे आणि त्यानंतर त्यावर भरभककम खर्च करून ती ब्रेबस कडून रूपांतरीत करून घ्यावी लागणार आहे.

ही कार ० ते १०० किमीचा स्पीड ३.५ सेकंदात घेते व तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३५० किमी. तिला बायटर्बो ६.० लिटर व्ही ८ इंजिन, सेव्हन स्पीड ऑटोट्रान्समिशन दिले गेले आहे. कारचा वेग आणि हॅडलींग उत्तम बनविण्यासाठी कार्बन एरोडायनामिक कंपोनंट व २१ इंची व्हील दिली गेली आहेत. फ्रंटला नवीन कार्बन फिनिश स्पॉयलर तर बॅक ला कार्बन डिफ्युजर व स्पॉईलर दिले गेले आहे. मोठे काँप्रेसर, टर्बो चार्जर, कार्बन इनटेक व कार्बन एअर डक्ट मुळे कारचा परफॉर्मन्स फारच चांगला आहे. कारचे इंटिरियरही खास बनविले गेले आहे. कारसाठी नक्की किती पैसे मोजावे लागतील हे मात्र अद्यापी जाहीर केले गेलेले नाही.

Leave a Comment