मुंबई – युरोपिअन महासंघातून ब्रिटनने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात झाला असून तब्बल ४ लाख कोटींचे नुकसान शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांना झाले आहे. बाजार उघडल्यानंतर काही मिनिटातंच गुंतवणूकदारांना हा फटका बसला असून सोने आणि चांदीच्या दरातही विक्रमी वाढ झाली आहे.
ब्रेक्झिटमुळे ४ लाख कोटींचे नुकसान
ब्रेक्झिटमुळे बाजार उघडण्याआधीच सेन्सेक्स तब्बल ९०० अंकांनी गडगडला होता. ३१ वर्षातील निच्चांक पाऊंडने गाठला होता. डॉलरच्या तुलनेत पाऊंड ९ टक्क्यांनी घसरला होता. सेन्सेक्सवरही याचा परिणाम झाला असून १००० अंकांनी गडगडला होता. २६ हजाराच्या खाली सेन्सेक्स आला होता. निफ्टी आणि रुपयामध्येदेखील घसरण झाली होती. जपानमधील शेअर बाजारात ८ टक्क्यांनी घसरण झाली. तिथे सर्किट ब्रेकर लावून बाजाराचे काम दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते.