पुढील आठवड्यात व्हॉट्सअॅपवरील बंदीच्या मागणीवर सुनावणी

whatsapp
नवी दिल्ली : पुढील आठवड्यात व्हॉट्सअॅपवरील बंदीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल कऱण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार असून हरयाणाचे आरटीआय कार्यकर्ता सुधीर यादव यांनी व्हॉट्सअॅपच्या एंड-टू-एंट इंक्रिप्शन पॉलिसीबाबत याचिका दाखल केलीये.

व्हॉट्सअॅपने गेल्या एप्रिलपासून प्रत्येक मेसेजला २५६ बीट एनक्रिप्ट केले आहे. ज्याला डीकोड केले जाऊ शकत नाही. जर व्हॉट्सअॅपकडून एखाद्या व्यक्तीचा डेटा सरकारने मागितले ते स्वत: या मेसेजना डिकोड करु शकत नाही. व्हॉट्सअॅपच्या या फीचरमुळे दहशतवादी आरामात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देशाला धोका पोहोचवणाऱ्या योजना बनवू शकतात. यामुळे देशाला नुकसान पोहोचू शकते, असे यादव यांनी याचिकेत म्हटले आहे. तसेच २५६ बीटच्या मेसेजला डिकोड करण्यासाठी १००हून अधिक वर्षे लागतील. २९ जूनला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Leave a Comment