आईशप्पथ ! ८ जीबी रॅमचा स्मार्टफोन?

leeco
चार जीबी व सहा जीबी रॅमचे स्मार्टफोन अजून बाजारात रूळले नसतानाच चीनी कंपनी लेईको रेकार्डतोड ८ जीबी रॅमचा स्मार्टफोन लवकरच बाजारात आणत आहे. या कंपनीने नुकताच त्यांचा ६ जीबी रॅमचा लेईको ली मॅक्स दोन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. ८ जीबी रॅम चे त्याचेच अपग्रेड व्हर्जन असेल असे समजते.

नव्या स्मार्टफोनसाठी ८ जीबी रॅमसोबत स्नॅपड्रॅगनचा ८२३ प्रोसेसर दिला जाणार असून हा फोन शांघाय येथे भरत असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये म्हणजे २९ जूनला सादर केला जाणार आहे. या फोनसाठी बाकी सर्व फिचर्स लेईको ली मॅक्स टू प्रमाणेच असतील असेही समजते. फोनचा स्क्रीन ५.७ इंची फुल एचडी, ६४ जीबी इंटरनल मेमरी, ३०००एमएएच बॅटरी असेल शिवाय त्याला २५ एमपीचा रियर कॅमेराही असेल.

Leave a Comment