सीओईपीचा स्वयंम अवकाशात यशस्वीपणे कार्यरत

swayam
पुणे – पुण्याच्या सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पहिल्या स्वयम या उपग्रहाने अवकाशात यशस्वी झेप घेतली असून तो योग्य प्रकारे कार्यरत झाला आहे. इस्त्रोने एकाच वेळी २० उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इतिहास नुकताच रचला आहे व त्यात स्वयमचाही समावेश होता. स्वयम चे प्रक्षेपण पाहण्यासाठी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात खास व्यवस्था केली गेली होती. तेथे काऊंटडाऊन सुरू असताना विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उत्साहाला एकच उधाण आल्याचे तसेच वातावरणात तोडा तणाव निर्माण झाल्याचेही दिसून आले.

इस्त्रोच्या पीएसएलव्हीसह उड्डाण केल्यानंतर स्वयम १७ व्या मिनिटाला रॉकेटपासून वेगळा झाला व ४५ मिनिटांनी त्याचा अन्टेना संदेशवहनासाठी योग्य स्थितीत आला. पृथ्वीभोवती फिरताना ११ वाजण्याच्या सुमारास स्वयमचा पहिला बिकन आला व त्यावरून त्यांची यंत्रणा सुस्थापित झाल्याचे व तो योग्य तर्हेाने कार्यरत झाल्याचे जाहीर केले गेले.

इस्त्रोने २००८ मध्ये एकाचवेळी १० उपग्रह प्रक्षेपित केले होते. एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचे रेकॉर्ड रशियाने २०१४ साली नोंदविले असून त्यावेळी त्यांनी ३७ उपग्रह प्रक्षेपित केले होते. नासाने एकावेळी २९ उपग्रह प्रक्षेपित करण्याची कामगिरी बजावली आहे.

Leave a Comment