राजधानीत लवकरच ‘सीएनजी’वर धावणार दुचाकी

moped
नवी दिल्ली: आयजीएल आणि गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या पुढाकाराने सुरू असलेल्या प्रदूषणविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून दिल्लीमध्ये लवकरच ‘सीएनजी’वर दुचाकी वाहने धावणार आहेत. एक किलो ‘सीएनएन’जी वर १२० किलोमीटर चालणारी दुचाकीसाठीची ‘गॅस कीट’ ‘इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड’ने बनविली आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. राजधानीत होणाऱ्या हवा प्रदूषणापैकी ३० टक्केहून अधिक प्रदूषण दुचाकीमुळे होते. निम्न मध्यमवर्गीय दुचाकी वाहने वापरत असल्याने ‘ऑड-इव्हन’ योजनेतून दुचाकींना वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘सीएनजी’वर चालणाऱ्या दुचाकीचा वापर महत्वाचा ठरणार आहे.

दिल्ली येथे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत ‘सीएनजी’वर चालणाऱ्या दुचाकीला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. दिल्लीत प्रायोगिक तत्वावर यशस्वी ठरल्यानंतर ‘सीएनजी’ वर चालणारी दुचाकी देशभर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Leave a Comment