चीनची अंतराळात बटाटे, टॉमेटोची शेती

china
बीजिंग : अंतराळात गहू, सोयाबीन आणि बटाट्यासारखी २५ पिके घेण्याचा प्रयोग चीनने सुरू केला असून ऑक्सिजन, पाणी आणि धान्याच्या पुनर्वापराचे तंत्रज्ञान विकसित करणे हा या प्रयोगाचा उद्देश आहे, मनुष्याला ज्याद्वारे अंतराळात दीर्घकाळापर्यंत जिवंत राहणे शिकविता येईल.

शुक्रवारपासून ४ जणांनी या प्रयोगांतर्गत पूर्णपणे सीलबंद कॅप्सूलमध्ये राहण्यास प्रारंभ केला आहे. हे कॅप्सूल चीनच्या गुआंग्डोंग प्रांताच्या शेंजेन भागात बनविण्यात आले आहे. या कॅप्सूलमध्ये अंतराळासारखी शून्य गुरुत्वाकर्षणाची स्थिती आहे. याच्या मदतीने पृथ्वीवरच अंतराळाचे सर्व प्रयोग केले जातील.या प्रयोगाचा उद्देश ‘नियंत्रित परिस्थितीपूर्ण जीवनप्रणाली’ चे संशोधन करणे आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी शेनझाउ अंतराळ यानाने प्रेरित होऊन हे कॅप्सूल विकसित केले आहे. यात अंतराळात वाढविण्यात आलेली रोपे महत्त्वाची भूमिका पार पाडतील. ते ऑक्सिजन आणि पाण्याचा पुनत्र्पादन करतील आणि बाहेरून पुरवठ्याची निर्भरता कमी करतील.चीन अंतराळात गहू, बटाटा, सोयाबीन, शेंगदाणे, स्टड्ढॉबेरी, चेरी, टोमॅटोची शेती करणार आहे. चीन आणि दुस-या देशात स्थित डझनभर वैज्ञानिक संस्था मिळून हा प्रयोग करत आहेत. यात शेनजेंगमध्ये स्थित स्पेस इन्स्टिट्यूट ऑफ साउर्दन चीन आणि चीन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स सामील आहे.

Leave a Comment