टेस्लाच्या मॉडेल एक्स एसयूव्हीची हातोहात विक्री

tesla
टेस्लाने त्यांचे मॉडेल एक्स बाजारात आणले असून या इलेक्ट्रीक एसयूव्हीची विक्री हातोहात होत असल्याचे समजते. ही इलेक्ट्रीक कार मॉडर्न इंजिनिअरींगचा एक उत्कृष्ठ नमुना आहे आणि ती तीन व्हेरिएंटमध्ये बाजारात आणली गेली आहे. पी ९० डी. ९० डी व ७५ डी अशी ही तीन व्हेरिएंट आहेत. या कारची रेंज अनुक्रमे ४६६, ४८५ व ४१६ किमी ची आहे व त्यांना ० ते १०० किमीचा वेग घेण्यासाठी लागणारा वेळ अनुक्रमे ३.८, ४.८ व ६ सेकंद इतका आहे. पी ९० डी व पी ९० चा टॉप स्पीड ताशी २५० किमी आहे तर ७५ डीचा ताशी २०९ किमी आहे.

या गाडीचे वैशिष्ठ म्हणजे तिच्या दुसर्‍या व तिसर्‍या रो सीट साठी फाल्कन विंगचा वापर केला गेला आहे. त्यामुळे मागच्या रोमध्येही बसता उतरताना प्रवाशाना अडचण होत नाही. या एसयूव्हीमधून सात जण आरामात प्रवास करू शकतात शिवाय तिला ऑटोमॅटिक कीलेस एन्ट्री व ऑटोमॅटिक रिअर लिफ्टगेट अशी फिचर्सही दिली गेली आहेत. इलेक्ट्रिक व्हील ड्राईव्ह, पार्किंग सेन्सर, ओर्मेटीक इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाईंड स्पॉट वॉर्निंग यांचा त्यात समावेश आहे. या कारला फुल एलईडी हेडलँप दिले आहेत तसेच जगातील सर्वात मोठी पॅनोरमिक विंडशील्ड ही दिली आहे. या कारची प्रत्येक सीट मागेपुढे होऊ शकते व तिसरी रो फ्लॅट केल्यास सामानासाठी पुरेशी जागा मिळू शकते. कारच्या बॅटरीसाठी ८ वर्षांची वॉरंटी आहे. कारची किंमत आहे १,४४,००० डॉलर्स म्हणजे साधारण १ कोटी रूपये.

Leave a Comment