सेल्फी क्रेझचा मोबाईल कंपन्यांनी बनविला धंदा

selfy
सेल्फी काढण्याचे व्यसन अथवा क्रेझ स्मार्टफोन बनविणार्‍या कंपन्यांच्या चांगलीच पथ्यावर पडली असून या कंपन्यांनी सेल्फी क्रेझचा धंदाच बनविला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे यात सर्व आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या सामील आहेत. या धंद्याला सेल्फी इकॉनॉमी असे गोंडस नांवही दिले गेले आहे. परिणामी अनेक स्मार्टफोन उत्पादक सेल्फीसाठी खास या नावानेच त्यांचे फोन बाजारात आणत आहेत.

selfy1
सोनीचा नवा एक्सपिरीया एक्स ए अल्ट्रा १६ एमपीच्या फ्रंट कॅमेर्‍यासह सादर केला गेला आहे तर आयफोन सिक्स एस, सॅमसंगचा एस सेव्हन यांनी सेल्फीसाठी ५ एमपीचे कॅमेरे देताना सेल्फीवाल्या जाहिरातींवर अधिक भर दिलेला दिसत आहे. त्यात वाईल्ड अँगल, स्माईल ओळखणारा, ऑटोमोड असे फिचर दिले जात आहेत. अर्थात कमीत कमी फिचर आणि जादा किंमत आकारण्याच्या या पद्धतीला सेल्फी मार्केटिंग असे म्हटले जात आहे. त्यात सेल्फीसाठी चपला, चमचे, अंगठ्या, कंगवे, सेल्फी स्टिक अशा अनेक आयडीयाही आहेतच. सर्वात कहर केला अ्राहे तो सेल्फी टोस्टरने. म्हणजे ब्रेड टोस्ट करताना सेल्फी काढण्याची सुविधा.

सोनीने एक्स सी ३ साठी वाईड अँगल दिला आहे तर एचटीसी ने दोन्ही कॅमेरे १३ एमपीचे दिले आहेत. मायक्रोमॅक्सने ८एमपीचा कॅमेरा देताना नाईट फोटोग्राफीसाठी सुविधा देऊ केली आहे तर झूम, ब्राईट मोड अशी फिचर्स दिली आहेत. जिओनीने ई ७ साठी १३ एमपीचा रोटेटिंग कॅमेरा दिला आहे तर ओप्पोने एन वन साठी रिमोटसह रोटेटिंग कॅमेरा दिला आहे. आसूस, मोटो एक्स स्टाईल, एलजी फोर, श्याओमी एमआय फोर यांनीही त्यांचे हे स्मार्टफोन सेल्फीच्या नावावरच बाजारात आणले आहेत.

Leave a Comment