वेटींग लिस्टच्या झंझटातून रेल्वे प्रवासी मुक्त

shatabdi
दिल्ली- रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांना एक चांगली भेट दिली असून येत्या १ जुलैपासून प्रवाशांची वेटींग लिस्ट तिकीटातून सुटका होणार आहे. ऑनलाईन तिकीट बुकींग करणार्‍या प्रवाशांना फक्त कन्फर्म व आरएसी तिकीटेच दिली जाणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. तसेच ही तिकीटे प्रादेशिक भाषेतूनही मिळू शकणार आहेत. अर्थात ही सेवा कांही खास स्पेशल गाड्यांसाठीच असून त्यात शताब्दी, राजधानी, दुरांतो व मेल व एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. तसेच ही तिकीटे पेपरलेस असतील म्हणजेच या गाड्यातून मोबाईल तिकीट वैध ठरणार आहे.

कन्फर्म तिकीट रद्द करणार्‍यांच्या पैशातून तिकीटाची निम्मी रक्कम कापली जाणार आहे. अर्थात रेल्वेच्या प्रत्येक क्लास साठी हा चार्ज वेगवेगळा असेल. रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखीही कांही सोयी दिल्या आहेत. त्यात ५० हजार रूपये भरून कुणीही सात दिवसांसाठी रेल्वेचा १ कोच बुक करू शकेल. कुणीही व्यक्ती अथवा संस्था ९ लाख रूपये भरून १८ डब्यांची पूर्ण रेल्वे सात दिवसांसाठी बुक करू शकेल. डब्यांची संख्या जास्त हवी असेल तर जादाच्या प्रत्येक डब्यासाठी ५० हजार रूपये व सात दिवसांपेक्षा अधिक दिवस हवी असेल तर पुढील प्रत्येक दिवसासाठी व एका कोचसाठी १० हजार रूपये भरावे लागणार आहेत.

Leave a Comment