जुलै महिन्यात बँक कर्मचाऱ्यांची चांदी

bank
तब्बल ११ दिवस बंद राहणार बँका
मुंबई: तुम्हाला जर बँकांची कामे जुलै महिन्यात करायची असतील तर तो विचार सोडून याच महिन्याच बँकांची कामे उरकून घ्या. कारण तब्बल ११ दिवस बँका जुलै महिन्यात बंद राहणार असल्यामुळे अर्धा महिना बँक बंद राहणार असल्याने तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

याबाबत एबीपी न्य़ूजने दिलेल्या वृत्तानुसार, काही बँकांचे देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण होणार असून याविरोधात स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूरच्या कर्मचाऱ्यांनी १२ आणि २८ जुलैला देशव्यापी संप पुकारला आहे. यासोबतच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचाही संप असणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यात बँका ११ दिवस बंद राहणार आहेत.

याव्यतिरीक्त प्रत्येक महिन्यात पहिल्या आणि चौथ्या शनिवारी आणि प्रत्येक रविवारी सुट्टी ठरलेली आहे. तसेच ६ जुलै रोजी ईदची सुट्टी आहे. १३ जुलैला एसबीआय बॅंक सोडून ऑल इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन यांच्या आवाहनावरून एसबीबीजेसहीत इतरही अन्य सर्व बँका देशव्यापी संपावर असतील. तेच २९ जुलैला यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनच्या आवाहनानंतर एसबीबीजेसहीत अन्य बँका संपावर असतील.

यासोबतच २ जुलैला पहिला शनिवार आणि २३ जुलैला चौथा शनिवार असल्याने बँक बंद राहतील. ३, १०, १७, २४ आणि ३१ जुलैला रविवारची सुट्टी असेल. ६ जुलैला ईदची सुट्टी असेल आणि १२ व २८ जुलैला स्टेट बॅंक ऑफ बिकानेर अ‍ॅंण्ड जयपुर संपावर आहे. १३ जुलैला देशव्यापी संपामुळे बॅंक बंद राहतील तर २९ जुलैला युनायटेड फोरम ऑफ बॅंक यूनियनच्या बंदमुळे कामकाज होणार नाही. यामुळे एकूण ११ दिवस बॅंक बंद राहणार आहेत. म्हणजे जुलैमध्ये एकूण २,३,६,१०,१२,१३,१७,२३,२४,२८,३१ तारखांना बॅंक बंद राहतील. त्यामुळे तुमची कामे जून महिन्यातच पूर्ण करून घेण्याचा विचार करा.

Leave a Comment