ओप्पोने लॉन्च केला ए३७

oppo
मुंबई – स्मार्टफोनच्या दुनियेत चीनने जोरदार भरारी घेतली असून, एक नवा कोरा स्मार्टफोन चीनी कंपनी ओप्पोने लॉंच केला आहे. या स्मार्टफोनचे नाव ए३७ असे असून, ज्या लोकांना सेल्फी काढायची हौस आहे, अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन अगदीच खास असणार आहे.

एकापेक्षा एक असे जबरदस्त फिचर्स या स्मार्टफोनमध्ये असून, ती नक्कीच ग्राहकांना आवडतील असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. या स्मार्टफोनची चीनमधील बाजारपेठेत किंमत १३ हजार ३०० रुपये आहे. मात्र, भारतात हा स्मार्टफोन कधी लॉन्च होईल, याबाबत ओप्पो कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, सध्या हा स्मार्टफोन ग्रे आणि रोझ गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध आहे.

ए३७ स्मार्टफोनचा डिस्प्ले ५ इंचाचा एचडी आयपीएस असून त्याचे ७२०×१२८०0 पिक्सेल रिझॉल्युशन आहे. यात १.५ GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक एमटी-६७५० प्रोसेसर आणि २ जीबी रॅम तसेच १६ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडीच्या सहाय्याने १२८ जीबीपर्यंता स्टोरेज वाढविता येऊ शकते. त्याचबरोबर ५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टम आणि अत्यंत दर्जेदार कॅमेरा असे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले जात आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य असे का, या स्मार्टफोनला ८ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. तर, सेल्फीप्रेमिंसाठी खास ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. २६३० बॅटरी क्षमता असलेला हा स्मार्टफोन वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएससाठी बेसिक कनेक्टिव्हिटी तसेच, ४जी सपोर्ट युक्त आहे.

Leave a Comment