इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा; एकाच वेळी २० उपग्रहांचे यशस्वी उड्डाण

isro
श्रीहरीकोटा – आज भारतीय अंतराळ संशोधनात ऐतिहासिक दिवस म्हणून गणला जाणार असून आज एकाचवेळी २० उपग्रह आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतिश धवन केंद्रातून अवकाशात सोडले गेले. या २० उपग्रहांनी पीएसएलव्ही- सी ३४ च्या माध्यमातून यशस्वी उड्डाण केले.

या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल पीएसएलवी-सी ३४ चा वापर करण्यात आला. त्यामध्ये भारताचे भू-सर्व्हेक्षण अंतराळ यान काटरेसॅट-२ चा समावेश आहे. आज सकाळी ९.२६ मिनिटांनी अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण स्थानावरुन प्रक्षेपण करण्यात आले. काटरेसॅट-२ श्रृंखला काटरेसॅट-२ ए आणि २ बी सारखी आहे. यासोबत पाठवण्यात येणारे अन्य १९ उपग्रहांचे ५०५ किमी अंतरावरून ध्रुवीय सूर्य कक्षात समावेश करण्यात येणार आहे. इस्त्रोनुसार, या २० उपग्रहाचे वजन सुमारे १२८८ किलो आहे. काटरेसॅट-२ श्रृंखलेत पाठवण्यात येणारे अन्य उपग्रहात अमेरिका, कॅनडा, जर्मनी, आणि इंडोनेशियासह भारतीय विद्यापीठांचे दोन उपग्रह आहेत.

Leave a Comment