लॅन्ड रोव्हर स्पोर्टने ओढली १०० टन वजन असलेली ट्रेन

land-rovar
मुंबई – आजवर तुम्ही कधी असे ऐकले आहे का एका कारने एक अख्खी ट्रेन ओढत वाहून नेली म्हणून? नाही ना? पण आता तुम्ही या व्हिडिओत तेच बघणार आहात. चक्क एक १०० टन वजन असलेली ट्रेन जग्वार लॅन्ड रोव्हर स्पोर्ट कारने ओढली आहे.

यूट्यूबवर सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला असून या व्हिडिओत एक एका १०० टन वजन असलेली ट्रेन ओढत नेताना दिसत आहे. हा व्हिडिओ नुकताच स्वित्झर्लंडला शूट करण्यात आला. ज्यात जगुआर लॅंड रोव्हर डिस्कवरी स्पोर्ट कार एका १०० टन वजन असलेल्या कार ओढून नेत आहे. एका बोइंग विमानाइतके या ट्रेनचे वजन असते.

हा व्हिडिओ कार प्रमोशनसाठी शूट करण्यात आला आहे. १५ जूनला हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता आता या व्हिडिओला पाच लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.