ट्विटर अपलोड करता येणार १४० सेकंदाचा व्हिडीओ

twitter
न्यूयॉर्क – १४० शब्दांपर्यंत शब्दमर्यादा ट्विटरवर वाढवल्यानंतर आता ट्विटरवरील व्हिडीओची लांबी देखील वाढवण्यात आल्यामुळे आता १४० सेकंदाचा व्हिडीओ ट्विटर युझर्सना पोस्ट करता येणार आहे.

ट्विटर हे फेसबुक आणि गुगलच्या यूटयुबच्या तुलनेत मागे पडत असल्यामुळे हा नवीन बदल करण्यात आला असून युझर्स टिकवणे आणि वाढवणे हे दोन त्यामागे मुख्य उद्देश आहेत. आता ट्विटरवर १४० सेंकंदाचे व्हिडीओ तुम्ही अपलोड करु शकता. ट्विटरवर व्हिडीओ प्रसिद्ध करणा-याला त्यातून पैसे कमावण्याची सुविधाही ट्विटर उपलब्ध करुन देणार आहे. यापूर्वी ट्विटरवर फक्त ३० सेंकंदाचा व्हिडीओ अपलोड करता येत होता. त्याशिवाय ट्विटरने ट्विटर एंगेज हे नवे मोबाईल अॅपही विकसित केले आहे.

Leave a Comment