२२ जूनपासून ग्राहकांना मिळणार मोटो जी ४

moto
मुंबई: २२ जूनपासून ग्राहकांसाठी मोटोरोला आपला नवा मोटो जी ४ हा स्मार्टफोन उपलब्ध करून देत असून १७ मे रोजी आपला नवा स्मार्टफोन मोटो जी ४ प्लस मोटोरोलाने लाँच केला होता. याचवेळी कंपनीने ही घोषणा केली होती की, मोटो जी ४ स्मार्टफोन जून महिन्यात उपलब्ध होईल. ग्राहक गेल्या कित्येक दिवसांपासून या स्मार्टफोनची वाट बघत आहेत.

याबाबतची माहिती मोटोरोलाने ट्विटरवरुन दिली असून हा स्मार्टफोन २२ जून रोजी फक्त ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन इंडियावरुन खरेदी करता येणार आहे. मोटो जी४चा १६ जीबीचा एकच व्हेरिएंट आहे. २ जीबी रॅम असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत ११ हजार रूपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोटो जी४ आणि जी प्लस यांचे फिचर्स जवळपास सारखेच असून फक्त कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सर यामध्ये फरक आहे. मोटो जी४चा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल आहे. तर जी प्लसमध्ये १६ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. मोटो जी ४मध्ये ५.५ इंच फूल-एचडी १९२०×१०८० पिक्सल टीएफटी डिस्प्ले आहे. यामध्ये अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो सपोर्ट आहे. तसेच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ सपोर्टही आहे. यामध्ये १.५ गीगाहर्त्झ ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६१७ देण्यात आला आहे. यामध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या आधारे १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते. यामध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच बॅटरी ३००० mAh क्षमतेची आहे. कनेक्टिव्हिटीचा विचार केल्यास यामध्ये मायक्रो यूएसबी, 3.5 एमएस हेडसेट जॅक, ब्ल्यूटूथ ४.१, वाय-फाय, जीपीएस देण्यात आले आहे.

Leave a Comment