श्याओमीचा एमआय मॅक्स ३० जूनला भारतात

mi-max
श्याओमीने गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच केलेला त्यांचा सर्वात मोठा स्क्रीन असलेला एमआय मॅक्स हा स्मार्टफोन/ फॅब्लेट ३० जूनला भारतात येत असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीचे उपाध्यक्ष ह्यूगो बारा यांनी ही घोषणा केली आहे.

या स्मार्टफोनला ६.४४ इंची डिस्प्ले दिला गेला आहे व त्याची जाडी आहे ७.५ मिमी. या फोनसाठी मेटल बॉडी आहे व तो सिल्व्हर, गोल्ड व डार्क ग्रे कलरमध्ये मिळू शकणार आहे. ड्युअल सिम, १६ एमपीचा फेस डिटेकशन ऑटोफोकस रिअर कॅमेरा, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. हा फोन फोरजी, एलटीई सह अन्य सामान्य कनेक्टिव्हीटीना सपोर्ट करतो.

हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये आहे. ३ जीबी रॅम व ३२ जीबी मेमरीच्या फोनसाठी १५ हजार, ३ जीबी रॅम व ६४ जीबीच्या मेमरीसाठी १७ हजार तर ४ जीबी रॅम व १२८ जीबीच्या मेमरीसाठी २०५०० रूपये अशा त्यांच्या किंमती आहेत.

Leave a Comment