योग जनक पतंजलींचे गांव

patanjali
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस १९१ देशांतून साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर योगासनांचे जनक महर्षि पतंजली यांच्याविषयी जाणून घेणे योग्य ठरेल. महर्षि पतंजलीनी योगसूत्रे हस्तलिखित स्वरूपात आणली व त्याचा लाभ आज अब्जावधी लोकांना होत आहे. पतंजली यांना शेष नागाचे अवतार मानले जाते.

पुरातत्त्व तज्ञ नारायण व्यास यांच्या मते पतंजलींचा जन्म इ.स.पूर्व २०० वर्षांपूर्वी म्हणजे साधारण २ हजार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील गोनारघ (गोंदरमऊ, गोनिया) येथे झाला. कांही दिवस येथे राहिल्यानंतर ते बिहारमधील मगध मध्ये गेले. कोशांबी ते उज्जैन रस्यावर असलेल्या एका गांवातही ते राहिले होते. तेथे अनेक साधुसंत येत असत व त्यांच्याकडूनच पतंजलींना योगाचे मार्गदर्शन मिळाले. पतंजलींचे गुरू पाणिनी हे होते. पतंजलींनी योगाभ्यासाला अष्टांग योगाचे स्वरूप देऊन त्याचे हस्तलिखित केले. त्यामुळे योगाचे डॉक्युमेंटेशन करण्याचा मान पतंजलींकडे जातो. त्यापूर्वी योगाभ्यास माहिती होता मात्र तो लिखित स्वरूपात नव्हता.

वाराणसीत पतंजलींनी गुरू पाणिनी यांच्यासोबत वास्तव्य केले होते. पतंजली शेष नागाचे अवतार मानले जातात व त्यामुळे त्यांचे कुठलेही चित्र शेष नागासोबतच असते. पतंजलींच्या मूळ गांवी सध्या फक्त शेती आहे. कांही जुन्या विहीरी आहेत. येथे झालेल्या उत्खननात पतंजलींच्या काळातील कांही भांडी व दगडी हत्यारे सापडली आहेत. उत्तर प्रदेशचे माजी पर्यटन मंत्री सुबोधकांत सहाय यांनी पतंजलींच्या मूळ गांवी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे येाग संस्थान उभारण्याची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात ते उभारले गेलेले नाही असेही समजते.

Leave a Comment