योगाची बाजारपेठ ३० टक्के वाढली

yoga
दिल्ली- जगभरात आज आंतराराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना असोचेमने केलेल्या एका सर्वेक्षणात गेल्या वर्षात योगाभ्यास करणार्‍यांच्या संख्येत तब्बल ३० टक्कयांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज पंतप्रधान मोदी चंदिगढ मध्ये ३० हजार जणांच्या सोबत योगासने करणार आहेत तसेच मंत्रीमंडळातील ५७ मंत्री विविध ठिकाणी योग कार्यक्रमात सहाभागी होत आहेत.

असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थेने भारतातील १० बड्या शहरात योग विषयक सर्वेक्षण केले. त्यात असे आढळले की योगाभ्यास नेमाने करणार्‍यांची संख्या ३० टक्के वाढून ती चार कोटींवर गेली आहे. त्याचबरोबर योगासाठी लागणार्‍या सामानाचा व्यवसायही ३५ ते ४० टक्के वाढ झाल्याचे दाखवितो आहे. ५३ टक्के कापर्रेट कंपन्यांनी योग सेशन सुरू केली आहेत. व तेथे नेमाने योगाभ्यास केला जात आहे. भारताच्या या प्राचीन पद्धतीमुळे कर्मचार्येयांना आजारापासून संरक्षण, मानसिक बळात वाढ, स्मरणशक्तीमध्ये वाढ, ऑफिस कामाचा ताण सहन करण्याची शक्ती असे अनेक फायदे होताना दिसून आले आहे.

विशेष म्हणजे देशात योग प्रशिक्षण देणार्‍या संस्थांची संख्याही लक्षणीय वाढली असून तेथे दरमहा ४०० ते १५०० रूपयांपर्यंत फी आकारून योगशिक्षण दिले जाते आहे. तसेच योगासाठी लागणार्‍या चटया, कपडे, टॉवेल व अन्य सामानाची बाजारपेठही बहरून १ हजार कोटींवर गेली आहे. योगसंस्थांतून योगाभ्यास करणार्‍यांच्या संख्येत महिला आघाडीवर आहेत. तसेच योगाभ्यास करणार्‍यांमध्ये विद्यार्थी, दिवसभर काबाडकष्ट करणारे मजूर, कर्मचारी, विभिन्न व्यावसायिक, कंपन्यांचे सीईओ, सेवानिवृत्त अशा सर्व थरांतील लोक आहेत.

या सर्वेक्षणात जिम का योग असेही सर्वेक्षण केले गेले तेव्हा अनेकांनी जिम पेक्षाही योगाभ्यास अधिक फायदेशीर ठरत असल्याचे मत व्यक्त केले.

Leave a Comment