बीएमडब्ल्यूची आकर्षक लेक रोझ आर नाईनटी बाईक

rnine
बीएमडब्ल्यूने पॅरिस डकार रॅलीवरून प्रेरणा घेऊन बनविलेली मोटराड कॉन्सेप्ट लेक रोझ आर नाईन टी बाईक आकर्षक रंगात सादर केली आहे. अनेक बाईकप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात ही बाईक यशस्वी ठरली असल्याचे दिसून येत आहे. पॅरिस डकार ही जगातील सर्वाधिक कठीण बाईक रेस समजली जाते. या बाईकचे नांव डकारपासून ३५ किमी अंतरावर असणाऱ्या लेक रेल्बावरून घेतले गेले आहे. या सरोवराचे पाणी त्यातील विशिष्ठ प्रकारच्या शैवालांमुळे गुलाबी दिसते.

या बाईकला ११७० सीसी एअर कूल्ड बॉक्सर ट्विन इंजिन दिले गेले आहे. सिंगल सीट व मोठे फयूएल टँक दिल्याने ही बाईक रेसिंग साठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा कंपनीचा दावा आहे. राऊंड हेडलाईटने या बाईकला आगळा लूक मिळाला आहे तसेच खडबडीत रस्त्यांसाठी या बाईकचे सस्पेन्शन अधिक लांबीचे आहे. ऑफ रोड टायर्स दिले गेले आहेत आणि ही बाईक आकर्षक रंगात ग्राहकांच्या पसंतीनुसार मिळणार आहे. बाईक ग्राहकाला बाईक कलरशी मॅचिंग होईल असे जॅकेट व हेल्मेट घेण्याचे ऑप्शनही दिले गेले आहे.

Leave a Comment