एचटीसीने लॉन्च केला डिझायर ६३० स्मार्टफोन

htc
मुंबई : अखेर भारतात एचटीसी डिझायर ६३० स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला असून पहिल्यांदा या स्मार्टफोनचे सादरीकरण एमडब्ल्यूसी इव्हेंटमध्ये करण्यात आले होते. एचटीसीकडून जूनमध्ये स्मार्टफोन लॉन्च करण्याचे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे अखेर हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. एचटीसी डिझायर ६३० यूनिक मायक्रो स्प्लॅश स्टायलिंग आहे.

ग्रेफाईट ग्रे रिमिक्स आणि स्ट्रेटस व्हाईट रिमिक्स या रंगांमध्ये एचटीसी डिझायर ६३० स्मार्टफोन उपलब्ध असून या स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९० रुपये एवढी आहे आणि देशभरातील रिटेल स्टोअर आणि एचटीसी इंडिया स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

एचटीसी डिझायर ६३० स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा ७२०×१२८० पिक्सेलचा एचडी सुपर एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर ६ गीगाहर्ट्ज़ क्वाड-कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन ४०० प्रोसेसर आणि एड्रेनो 305 जीपीयू ग्राफिक्स देखील देण्यात आले आहे. यात २ जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज जी १२८ जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा (मायक्रो एसडी) देण्यात आली आहे. यात एलईडी फ्लॅश, बीएसआय सेन्सर, अपर्चर एफ/४ सोबत १३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा त्याचबरोबर १०८० पिक्सेल व्हिडीओ रेकॉर्डिंगसह एफ/८ अपर्चरसोबत 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, बीएसआय सेन्सर, बूमसाऊंड टेक्नोलॉजी, डॉल्बी साऊंड देखील देण्यात आले आहे. एचटीसी डिझायर ६३० स्मार्टफोन अँड्रॉईड ६.० मार्शमॅलोवर चालणारा असून, यावर एचटीसी सेन्स ७ यूआय स्कीन देण्यात आली आहे. यात वायफाय ११ बी/जी/एन, ब्लूटूथ ४.१, जीपीएस, यूएसबी (ओटीजी) अशा कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आल्या आहेत. या स्मार्टफोनमध्ये २२०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सेलेरोमीटर, एँबियंट लाईट सेन्सर, जायरोस्कोप इत्यादी फीचर्सही देण्यात आले आहेत.

Leave a Comment