शेअर्सद्वारे कमावलेली भरीव रक्कम फेसबुक करणार दान

mark
सॅन फ्रान्सिस्को – क्लास सी स्टॉकचे ५.७ अब्ज समभाग प्रकाशित करण्याच्या प्रस्तावाला फेसबुक इन्क. गुंतवणूकदारांनी मंजुरी दिली असून कंपनीच्या वार्षिक भागधारकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी मार्क झुकेरबर्ग यांचे फेसबुकवरील नियंत्रण कायम रहावे यांची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्क झुकेरबर्ग हे फेसबुकचे सहसंस्थापक आहेत. मार्कने फेसबुक शेअर्सद्वारे कमावण्यात आलेली भरीव रक्कम दान करण्याची योजना आखली आहे. यावर प्रतिक्रीया देताना तो म्हणाला की आता मला मतदानाचे अधिकार वापरण्याची गरज नाही. आता मी भरीव रक्कम दान करू शकतो.

Leave a Comment