शैक्षणिक कर्ज काढणार्‍यात चीनी पालक आघाडीवर

education
एचएसबीसी तर्फे व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन या विषयावर पंधरा देशात नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले त्यात मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्यात चीनी पालक नंबर वन असल्याचे दिसून आले आहे. भारताचा या यादीत तिसरा क्रमांक आहे तर मेक्सिको दोन नंबरवर आहे.

या सर्वेक्षणात असे दिसले चीनमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेणार्‍या पालकांचे प्रमाण ८१ टक्के, मेक्सिकोत ७४ टक्के तर भारतात ७१ टक्के आहे. निवृत्तीनंतर स्वतःपेक्षाही मुलांना चांगल्या विद्यापीठात शिकता यावे यासाठी पालक कर्ज घेण्यास प्राधान्य देतात. तर ४१ टकके पालक स्वतःवरील खर्चापेक्षा मुलांच्या शिक्षणावरील खर्चाला अधिक महत्त्व देतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, इजिप्त, फ्रान्स, हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, मलेशिया, मेक्सिको, सिंगापूर, तैवान, यूएई, युके व अमेरिका अशा १५ देशांत हे सर्वेक्षण केले गेले.

Leave a Comment