राजन यांच्या निर्णयामुळे गडगडला आणि सावरला शेअर बाजार

raghuram-rajan
नवी दिल्ली – गव्हर्नरपदाच्या दुसऱ्या टर्मसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलेल्या नकाराचा आज शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. शेअर बाजाराची आज सकाळी सुरुवात नकारात्मक झाली असून सुमारे १७० अंशांची घसरण सेन्सेक्समध्ये झाली. तर, ६० अंशांच्या घसरणीसह निफ्टीदेखील सुरु झाला. परंतु काही काळात बाजार पुन्हा सावरला. ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची भीती वाढल्याने याचाही परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे बोलले जात आहे. भारतीय रुपयाचेही मूल्य ढासळले असून रुपयाचे मूल्य आज ६० पैशांनी घसरुन डॉलरच्या तुलनेत ६७.६८ एवढे झाले आहे.

केंद्रीय बॅंकेचे प्रमुख या नात्याने दुसरी टर्म (कार्यकाळ) करण्याची इच्छा नसल्याचे रघुराम राजन यांनी स्पष्ट केले आहे. राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, की ४ सप्टेंबरमध्ये गव्हर्नरपदावरून निवृत्त होत असून, आपण पुन्हा शिक्षणक्षेत्रात परतणार आहोत, असे सांगितले.

Leave a Comment