एकाच महिन्यात तुमच्या स्मार्टफोनची किंमत होते अर्धी !

smartphone
मुंबई: तुम्ही जर स्मार्टफोन घेण्याचा विचार करीत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही स्मार्टफोन घेतल्यानंतर त्याची एका महिन्याच्या आत अर्धी किंमत झालेली असते असे एका सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे.

एका संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एका वर्षात एखाद्या कारच्या किंमतीत २० टक्क्यांनी कमी होते. तर स्मार्टफोनची किंमत एका महिन्यात ६५ टक्क्यांनी कमी होते. या सर्वेक्षणावरून असे स्पष्ट होते, आयफोन हा अँड्रॉईडपेक्षा अधिक महत्वाचा आहे. आयफोन ४ आपल्या सुरुवातीच्या पाच वर्षानंतरही ३९ किंमत टिकवून असते. तर आयफोन (१६ जीबी) बाजारात आल्यानंतर एका वर्षापर्यंत ५० टक्के आपली किंमत टिकवते. सर्वाधिक घट ही सॅमसंग गॅलक्सी एस ४च्या किंमतीमध्ये पाहायला मिळते. २०१४साली बाजारात आल्यानंतर दोनच महिन्यात या स्मार्टफोनच्या किंमतीचं मूल्य अर्ध झाले होते. एचटीसी वन एम ९ अँड्रॉईड क्षेत्रात फारच वाईट अवस्था झाली. अवघ्या महिन्याभरात या स्मार्टफोनची किंमत ६५ टक्क्यांनी कमी झाली होती. स्मार्टफोनचे मूल्य अतिशय वेगान कमी होत आहे. कारण की, तंत्रज्ञानाचा विकास वेगाने होत असल्यामुळे अनेक नवनवीन मॉडेल बाजारात येत आहेत.

Leave a Comment