कमी उष्मांकाचे अन्नद्रव्य

food
उन्हाळा संपला आहे आणि पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यामध्ये जास्त उष्माकांचे पौष्टीक पदार्थ खाल्ले तर ते पचत नाहीत. मात्र त्या पदार्थाशिवाय एनर्जीही मिळत नाही. म्हणून पावसाळ्यात विचारपूर्वक अन्नपदार्थ निवडावे लागतात. आहारतज्ञांनी पावसाळ्यासाठी खालील आहाराची शिफारस केलेली आहे.

१. दुधी भोपळा – दुधी भोपळा हा ९० टक्के पाण्याने युक्त असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये उष्मांक कमी असतात. १०० ग्रॅम दुधी भोपळ्यात केवळ १५ युनिट इतके उष्मांक असतात. त्यामुळे पावसाळ्यात दुधी भोपळा खाणे इष्ट असते.

२. काकडी – काकडी सुध्दा कमी उष्मांकाची अधिक पोषणद्रव्यांची असते. कारण काकडीतसुध्दा ९० टक्के पाणी असते. पावसाळ्यात दोन जेवणामध्ये काहीतरी खावेसे वाटते तेव्हा काकडी खाल्लेली चांगली. तिच्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये आणि घातक पदार्थ लघवीवाटे निघून जातात. शक्यतो हिरवी काकडी खावी.

३. पालक – पालक ही उत्तम पालेभाजी समजली जाते. कारण तिच्यात उष्मांक कमी आणि लोह भरपूर असते. त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पदार्थातून न मिळणारी काही सूक्ष्म अन्नद्रव्ये पालकाच्या भाजीतून मिळू शकतात. ४. दोडका – पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारी फळभाजी म्हणजे दोडका. दोडक्याचे दोन फायदे म्हणजे त्यात उष्मांक तर कमी असतातच पण दोडक्यामध्ये पचनशक्ती सुधारण्याची आणि रक्त शुध्द करण्याची क्षमता असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही