आली निसानची मायक्रा सीव्हीटी

micra
नवी दिल्ली : प्रमियम हॅचबॅक कार मायक्रा सीव्हीटी आणि सीव्हीटी एक्सव्ही नुकतीच वाहनउत्पादक कंपनी निसानने लाँच केली आहे. कंपनीचे प्रबंध निदेशक अरुण मल्होत्रा यांनी सांगितले, की दोन वेरियंट मायक्रा सीव्हीटी एक्सएल आणि सीव्हीटी एक्सव्ही बाजारात आणली आहे. या कारमध्ये एक्स-ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (गिअर) देण्यात आले आहेत. या कारचे मायलेज १९.३४ किमी./प्रतिलिटर असणार आहे.

कंपनीकडून दावा करण्यात येत आहे, की भारतामध्ये प्रमियम हॅचबॅक श्रेणीच्या कारमध्ये सीव्हीटी आधारित वापर करणारी निसान ही भारतातील पहिली कार आहे. या कारमध्ये डुअल एअर बॅग, एन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, स्टिअरिंग ऑडिओ कंट्रोल आणि रिअल एलईडी लँप अशा सर्वोत्तम सुविधांसह प्रमियम हॅचबॅक श्रेणीमध्ये मायक्रा सीव्हीटी बाजारात येत आहे. मायक्रा सीव्हीटी एक्सएलची दिल्ली एक्स शोरुम किंमत ५.९९ लाख रुपयांपासून तर सीव्हीटी एक्सव्हीची किंमत ६ लाख ७३ हजार ५०० रुपयांपासून असणार आहे.