आजारपणावर स्वस्त औषधाचे नाव सांगणार मोबाइलअॅप

mobile
नवी दिल्ली – सरकार एक विशेष मोबाइलअॅप आता स्वस्त औषधांसाठी आणणार असून हे मोबाइलअॅप आजाराचे नाव फीड करताच त्यासाठी वापरली जाणारी औषधे आणि त्याची किंमत उपलब्ध करेल. ही औषधे शहरात कोणत्या ठिकाणी मिळतील याचा तपशील देखील मिळेल. एवढेच नाही तर औषधाची सुरक्षितता आणि गुणवत्तेबाबत पूर्ण तपशील उपलब्ध होईल.

पंतप्रधान जनऔषधी योजनेंतर्गत हे मोबाइलअॅप विकसित केले जात असून या मोबाइलअॅपची सेवा ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत सुरू होऊ शकेल. जे कोणीही आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड करू शकेल. लवकरात लवकर देशात सर्वांना चांगल्या गुणवत्तेची स्वस्त औषधे उपलब्ध करविली जावीत अशी सरकारची योजना आहे.

Leave a Comment