८ टक्क्याच्या खाली येऊ शकते ‘पीपीएफ’चे व्याजदर!

ppf
नवी दिल्ली- प्रथमच ८ टक्क्याच्या खाली ‘पीपीएफ’चे व्याजदर जाण्याची शक्यता निर्माण झाली असून ‘पीपीएफ’च्या तिमाही आढाव्यात व्याजदर सध्याच्या ८.१ टक्क्यापेक्षा खाली जाईल असा तज्ञांचा अंदाज आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार करमुक्त गुंतवणुकीत ‘पीपीएफ’ला सर्वाधिक महत्व देतात. पीपीएफचे व्याजदर खाली आल्यास त्याचा फटका त्यांना बसु शकतो. त्यातच पीपीएफ आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांच्या व्याजदराचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येणार असल्याने पीपीएफमधुन मिळणाऱ्या रकमेचा अंदाज बांधता येणार नाही.

Leave a Comment