नासा मंगळावर नेमणार शेतकरी, शिक्षक आणि मॅकेनिक

nasa
नवी दिल्ली – वैज्ञानिकांची नव्हे तर शेतकरी आणि शिक्षकांची गरज अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाला असून मंगळावर वस्ती वसविण्यासाठी नासाला शेतकरी, शिक्षक आणि मॅकेनिक हवे आहेत. लोकांना आकर्षित करण्यासाठी नासाच्या मंगळ मानव मोहिमेंतर्गत ८ पोस्टर्स जारी करण्यात आली आहेत. २००९मध्ये ही पोस्टर्स तयार करण्यात आली होती. परंतु ती पहिल्यांदाच सार्वजनिक केली गेली. सर्व पोस्टर्स नासाच्या वेबसाइटवरून मोफत डाउनलोड करता येऊ शकतात.

नासाच्या अनुसार रात्री काम करणाऱयांसाठी मंगळ उत्तम जागा आहे. अशा लोकांसाठी मंगळाचा उपग्रह फोबोसवर राहण्याची संधी आहे. मंगळावर कोणत्याही प्रकारची तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी मॅकेनिकांची देखील गरज भासेल. जर मंगळ मोहिमेतील तांत्रिक अडचणी सोडविण्यास मदत करण्याची इच्छा असेल तर मंगळावर जाण्याचा विचार करावा. बटाटा, टॉमेटो, पालक या पिकांच्या शेतीची सोनेरी संधी मंगळावर असून पिकांना नव्या तंत्रज्ञानाने वाढविण्याची कला अवगत असावी. नव्या गोष्टी शिकण्यासाठी, मंगळावर नवे मार्ग बनविणे आणि मार्गदर्शनासाठी नासाला शिक्षकांची गरज आहे. नासा आपल्या मनुष्य मोहिमेशी सामान्य लोकांना जोडण्यासाठी अशा गोष्टी करत आली आहे. याआधी त्याने मंगळावर सुट्टी व्यतित करण्यासाठी काही पोस्टर्स जारी केले होते. मंगळावर एकदा जीवन शक्य झाले तर मानवी वस्ती वसविण्यासाठी या सर्व लोकांची गरज भासेल असे नासाचे मानणे आहे.

जर तुम्हाला नासाच्या पोस्टर्सना पाहायचे असेल किंवा ती डाउनलोड करायची असतील तर http://mars.nasa.gov/multimedia/resources/mars-posters-explorers-wanted/ ला भेट द्यावी. येथे वेगवेगळी पोस्टर्स अनेक आकारांमध्ये मिळतील. त्यांना डाउनलोड करण्याबरोबरच प्रिंटचा पर्याय देखील तेथे उपलब्ध आहे.

Leave a Comment