दो चुटकी मीठ तुम्हाला बनवेल सर्वांगसुंदर

salt1
चिमूटभर मिठाची किंमत ती काय असे आपल्याला वाटत असेल तर हे चिमूटभर मीठच आपल्या अन्नाला स्वाद देत असते. हेच मीठ ब्यूटीसाठीही अत्यंत मौल्यवान ठरते आहे. मीठाचे अनेक फायदे आहेत. त्यात घरच्या घरीच त्याचा योग्य वापर करून सर्वांगसुंदर होण्याचा सोपा आणि सहज मार्ग अवलंबिता येतो. तो कसा ते पाहू

१)टोनर – मीठ हे त्वचेसाठी टोनर म्हणून काम करते. ते त्वचेची छिद्रे आतून स्वच्छ करते परिणामी त्वचा चमकदार बनते. चेहर्‍याचा तेलकटपणा कमी करून त्वचेतील तेल व पाण्याचा बॅलन्स राखते. त्यासाठी १ कप पाण्यात १ छोटा चमचा मीठ घालून ते मिश्रण स्प्रे बॉटल मध्ये भरावे व चेहर्‍यावर डोळे सोडून त्याचा स्प्रे घ्यावा. हलक्या हाताने चेहरा स्वच्छ धुवावा.

२) बॅलेन्सिंग मास्क- मीठ व मध हे त्वचेची सूज कमी करणारी आहेत तसेच त्वचेला आराम देणारी आहेत. पिंपल्सपासून सुटकाही देणारे आहेत. यासाठी २ छोटे चमचे मीठ व ४ चमचे मध एकत्र करून त्याची पेस्ट करावी व ती १०-१५ मिनिटे चेहर्‍यावर लावावी. नंतर हलक्या हाताने मसाज करून गरम पाण्यात मऊ कपडा बुडवून चेहरा साफ करावा.

३)फेशियल स्टीमर- अर्धा कप मीठ तीन कप पाण्यात उकळून त्याची वाफ चेहर्‍यावर घ्यावी.

salt2
४)फेस स्क्रब- मीठात अनेक प्रकारची खनिजे असतात. ती त्वचेला मुलायम बनवितातच पण त्वचेचा ओलेपणाही टिकवून ठेवतात. मीठामुळे त्वचेवरील छिद्रे मोकळी होतात. त्यासाठी १ चमचा मीठ व १ चमचा ऑलिव्ह ऑईल एकत्र करून चेहर्‍यावर चोळावे. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

५)बॉडी स्क्रब- मीठ शरीरावरची धूळ व मळ काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अंघोळीच्या पाण्यात १ चमचा मीठ घालून स्नान केल्यास ताजेपणा वाटतो. मीठ नखे नरम ठेवते तसेच ती मजबूत बनविते व त्यांना चमकही देते. त्यासाठी प्रत्येकी १ चमचा मीठ, लिंबू रस व बेकींग सोडा अर्धा कप कोमट पाण्यात घालून त्यात नखे बुडवावीत. मऊ ब्रशने स्वच्छ करावीत व नंतर हात धुवून त्यांना मॉइश्चरायझर लावावे. केसाखालच्या त्वचेसाठीही मीठ व ऑलिव्ह ऑईल एकत्र करून स्काल्पवर हलक्या हाताने मसाज केल्यास स्काल्पचे रक्ताभिसरण वाढते, केसांतील जादा तेल शोषले जाते, फंगल वाढ थांबते. नंतर डोके नेहमीप्रमाणे शांपूने धुतल्यास केस चमकदार दिसतात.

salt
६)स्वच्छ दात- मीठ, खायचा सोडा याच्या मिश्रणाने दात घासले तर दातांवर पडलेले डाग जातात. त्यासाठी २ चमचे मीठ व दोन चमचे सोडा मिक्स करून टूथब्रश ओला करून त्याने दात घासावे. दात स्वच्छ होतात. श्वासाला येणारी दुर्गंधी अर्धा चमचा मीठ व बेकींग पावडर अर्धा कप पाण्यात घालून त्या मिश्रणाने गुळण्या केल्यास नाहीशी होते. स्वच्छ पाण्याने त्यानंतर पुन्हा गुळण्या केल्यास तोंडात वाढणार्‍या व दुर्गंधी निर्माण करणार्‍या बॅक्टेरियाना अटकाव केला जातो.

Leave a Comment