भारत सरकार अफ्रिकेतील जमिनीवर घेणार डाळींचे उत्पादन

pulses
दिल्ली – दिवसेदिवस डाळींची होत असलेली भाववाढ व देशांतर्गत घटत चाललेले उत्पादन यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने अफ्रिकेतील मोझांबिक सारख्या देशात जमीन भाडेकरारावर घेऊन तेथे डाळ उत्पादन करण्यासंदर्भात विचार सुरू केला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. यासंदर्भात दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके मोझांबिक व म्यानमार या देशांचा दौरा करून त्यासंदर्भातली शक्यता पडताळून पाहणार आहेत. बुधवारी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी महागाईसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

डाळींची भाववाढ रोखण्यासाठी तसेच पुरवठा सुरळीत रहावा म्हणून सरकारने साडेसहा लाख टन डाळी आयात केल्या आहेत. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी आयात आहे. आयात डाळ बंदरात उतरविताना कडक निगराणी ठेवण्याचे तसेच साठेबाजी होत नाही यासाठी कडक नजर ठेवण्याचे आदेश सर्व राज्य सरकारांना दिले गेले आहेत. तसेच कोणत्याही डाळींची किंमत किलोला १२० रूपयांपेक्षा अधिक असू नये याची दक्षताही घेतली जात आहे.

Leave a Comment